गणेश वाडी तालुका इंदापूर येथील राज्य मार्गावरील  रुंदी वाढवलेल्या पुलावरील खड्ड्यापासून चार चाकी वाहनचालकांना व दुचाकी प्रवाशांना धोका होण्याची शक्यता.  पूल रुंदी करणाऱ्या ठेकेदाराचा मनमानी कारभार- प्रवाशांना धोका झाला तर याला जबाबदार कोण असणार ?

248

 

निरा नरसिंहपुर दिनांक 13 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

गणेशवाडी तालुका इंदापूर येथील बी. के .बी .एन राज्यमार्गा वरील गणेशवाडी तालुका इंदापूर येथील पूल असून या फुलाची रुंदी गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाढवलेली आहे. वाहतुकीसाठी प्रवाशांना पुलाच्या खड्ड्यापासून कसरत करावी लागत आहे. खड्ड्यामध्ये मुरूम न टाकल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना धोका होण्याची शक्यता आहे बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन काम पूर्ण करण्यास सांगावे असा येथील परिसरातील वाहतूकदार नागरिक आणि ग्रामस्थ यांची मागणी आहे.

——————————-‐——————

फोटो:-ओळी– गणेश वाडी तालुका इंदापूर येथील राज्यमार्गावरील पुलाची रुंदी वाढलेली व फुलावर खड्डा पडलेला दिसत असताना.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160