येरमणार ग्रा.प.चे कार्यरत सचिव श्री एन.जी.नरोटी यांना शासकीय रेकार्ड देने अन्यथा ग्रा.प.कार्यालय ला कुलूप टोकू – संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन

142

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम: अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत येरमनार करिता प्रभारी सचिव श्री आय.एच.पठाण कार्यभार सांभाळत होते.
संवर्ग विकास अधिकारी यांनी दिनांक 27/07/2020 रोजी
येरमनार ग्राम पंचायत करिता सचिव म्हणून श्री एन.जी.नरोटे यांना दिले होते.परंतु प्रभारी सचिवांनी आज प्रर्यंत श्री.नरोटे यांना ग्राम पंचायतचे शासकीय रेकार्ड दिलेला नाही.
परिणामी शासनाचे विविध योजना व ग्राम पंचायतीचे कामकाज करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. करिता प्रभारी सचिव श्री पठाण यांना शासकीय रेकार्ड श्री.नरोटे यांना देण्यास आदेश देण्यात यावी.
अन्यथा ग्राम पंचायत कार्यालयाला 15 ऑगष्ट 2020 रोजी कुलुप ठोकून पंचायत समिती कार्यालया समोर कायदेशीर आंदोलन करण्यात येईल अशी इशारा ग्राम पंचायत येरमनार चे सरपंच श्री बालाजी गावडे यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे व्यक्त केले आहे.