Home जालना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बंद झालेली बससेवा पुन्हा पुर्ववत करा-दीपक डोके

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बंद झालेली बससेवा पुन्हा पुर्ववत करा-दीपक डोके

168

प्रतिनिधी सुदर्शन राऊत,जालना

जालना: 25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या.
सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली.
ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले.

या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.

कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 % लोकांनी दाखवली आहे. 15 % लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. 5 % लोक vulnerable आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही ही नियंत्रणात आणता येत नाहीत वैद्यकीय दृष्ट्या गंभिर होत आहेत वा बळी पडत आहेत.
सरकारने या 15 % + 5 % = 20 % लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठेवले पाहिजे.
100 % लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80 % पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे.

कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.

एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. गणपती उत्सवासाठी खाजगी बस वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बेस्ट च्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे.
दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक डोके यांचा नेतृत्त्वाखाली करण्यात आले यावेळी वंचितचे पदाधिकारी दिपक डोके, अकबर इनामदार,विष्णु खरात, अॅड. कैलास रत्नपारखी,दिपक घोरपडे,विनोद दांडगे,अॅड. हर्षवर्धन प्रधान,कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे, विजय लहाने,दिपक रत्नपारखे,राज रत्नपारखे, राजेंद्र खरात, किशोर जाधव,सर्जेराव मगरे,ज्ञानेश्वर बोबडे,दिपक मोरे,अर्जुन जाधव,अनिल झोटे, सुरज सोनवणे,राहुल रत्नपारखे, बाबासाहेब साळवे,विकास जाधव,राहुल गंगातिवरे,सुधाकर म्हस्के, गौतम गंगातिवरे,लखन चित्ते, सिध्दार्थ कणकुटे,विकास हिवाळे, पवन काकडे, लखन सदावर्ते,लहुजी पहुरे,सुरेश काळे, नितिन बाळराज,लाला बाळराज,विलास नरवडे,राहुल नवगिरे,आकाश जाधव, किरण गंगातिवरे,विकास लहाने,गणेश धायडे,प्रशांत धांदरे,मनोज म्हस्के,सुरज बोर्डे,बकासुर खरात,निखील बोर्डे,मनोज दांडगे, नितिन दांडगे,सुनिल जाधव,सुभाष लहाने,प्रभु लोखंडे,त्रिंबक बोडखे,रामाप्पा काटकर,राहुल शिनगारे आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकन्हान लॅब टेकनिशियनसह ८ तर टेकाडी खदान नं ६ एक रूग्ण कन्हान परिसर ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १८८ रुग्ण.
Next articleयेरमणार ग्रा.प.चे कार्यरत सचिव श्री एन.जी.नरोटी यांना शासकीय रेकार्ड देने अन्यथा ग्रा.प.कार्यालय ला कुलूप टोकू – संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन