Home महाराष्ट्र लातूर शहरात तब्बल 15 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प .

लातूर शहरात तब्बल 15 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प .

170

 

कुलकर्णी सिद्धेश्वर वामनराव
कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज/दखल न्युज भारत

लातूर दि. 12/08/2020 रोजी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जिल्हातील वनक्षेत्र वाढावे व पर्यावरणाचा समतोल कायम रहावा या दृष्टीकोणातून किर्ती गोल्ड कंपनीच्या पुढाकारातून लाॅकडाऊनच्या कालावधीत लातूर शहरात एक नव्हे दोन नव्हे तब्बल 15 हजार वृक्षांची लागवड करून लातूर शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प करण्यात आला असून या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाअध्यक्ष
मा. अजित पाटील कव्हेकर व किर्ती गोल्डचे अर्जुन भूतडा यांच्या उपस्थितीत मजगे नगर परिसरात करण्यात आला असून यामध्ये पहिल्या टप्प्यात उबदार सावली देणाऱ्या भावा जातीच्या वृक्षाची लागवड करण्यात आली.
यावेळी लक्ष्मीकांत तोष्णिवाल, स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख , अर्जुन गायकवाड, उमेश इरपे , राजेश पवार , नितीन जाधव पंडीतराव बोडगे यांची उपस्थिती होती. लातूर जिल्हातील वनक्षेत्र कमी आहे . त्यामुळे आपल्याला अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते . ही बाब लक्षात घेवून पर्यावरणाचा समातोला राखण्यासाठी आपलेही काहीतरी योगदान रहावे, या दृष्टिकोणातून किर्ती गोल्ड कंपनीचे अर्जुन भूतडा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत 15 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलेला आहे. या संकल्पाला सोमवारी मूर्तरूप देण्यात आले असून शहरातील मजगे नगर परिसरात 100 वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षामध्ये उबदार सावली देणाऱ्या भावा जातीच्या वृक्षासह इतर सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून वृक्ष लागवडीचा हा उपक्रम साकारण्यात येत असला तरी या व्यापक प्रमाणात होणाऱ्या वृक्ष लागवडीमुळे लातूर जिल्हाच्या वनक्षेत्रात नक्कीच वाढ होणार आहे. त्यामुळे हा विधायक उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Previous articleयुवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मनोज सोनकुकरा यांची निवड
Next articleमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) आज अंतिम परीक्षा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रीटन सबमिशन दाखल…