कोव्हिड सहायता निधीसाठी मनसे मदत केंद्राची स्थापना

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा

वणी: राज्य शासनाने , महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाथार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे . त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करणेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची / मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड १९ या आजारामुळे निधन पावली आहे , त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु . ५०,००० / – ( रु . पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील . यासाठी वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर अर्जदाराने स्वत: मनसे रुग्ण सेवा केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केले आहे. सदर मदत केंद्र दिनांक १ डिसेंबर पासून मनसे रुग्ण सेवा केंद्रात चालू होणार आहे.

हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील
१) अर्जदाराचा स्वत : चा तपशील , आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
२ ) अर्जदाराचा स्वत : चा बँक तपशील.
३ ) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील.
४ ) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र.
५ ) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र.
अधिक महिती करीता संपर्क : मनसे रूग्ण सेवा केन्द्र वणी,
मो नो : 9765111933 (धनंजय त्रिंबके अध्यक्ष मनसे रुग्ण सेवा केंद्र ) ,9049343999(आजीत शेख उपाध्यक्ष मनसे रुग्ण सेवा केंद्र ) 79725 23629 (फाल्गुन गोहोकार वणी तालुका अध्यक्ष ) ,8975444342 (प्रविण डाहुले वणी तालुका उपाध्यक्ष) , 9923925255( शिवराज पेचे वणी शहर अध्यक्ष) , 9673136160 – ( गितेश वैद्य शहर उपाध्यक्ष ) ,9822097154( लक्की सोमकुवर) ,9765360095 ( वैभव पुराणकर),95116 34365 ( संकेत पारखी)