अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी, बोराळा फाट्यावरील घटना

युवराज डोंगरे/खल्लार:-खल्लार पो स्टे हद्दीतील बोराळा फाट्यावरील चौफुलीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान घडली
मेळघाटमधिल रहिवासी असलेले व जसापुर येथे कामासाठी आलेले टिकाराम पानसे वय 27 मालू टिकाराम पानसे वय 23 व 9 महिन्याचे लहान बाळ हे जसापुर येथे जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत टिकाराम पानसे पत्नी मालू पानसे व लहान बाळ गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती येथे हलविण्यात आले असून घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटेखेडे चालक संतोष चव्हान यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असुन (वृत्त लिहीपर्यंत)अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती