अखेर स्वखर्चातून तोडल्या दुतर्फा वाढलेल्या बंगाली बाभळी कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराम डिक्कर यांचा पुढाकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजूनही दुर्लक्षच ?

 

अकोट प्रतिनिधी

मुंडगाव लोहारी या दोन किलोमीटर अंतर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट अंतर्गत येत असलेल्या रस्त्यावर दुतर्फा दोन्ही बाजूने खूप मोठ मोठ्या बंगाली बाभळी वाढल्या होत्या त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला प्रवास करणाऱ्याना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु या रस्त्यावर बाभळी वाढल्यामुळे या रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे नेहमीच लहान मोठे अपघात होत होते. तसेच बातमीही प्रसिद्ध करण्यात आली होती हे विशेष जनतेला या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन लोहारी येथील कर्तव्य प्रतिष्ठानच्या तरूण युवकांनी समोर येऊन मुंडगाव लोहारी दोन किलो मीटर अंतर असलेल्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या वाढलेल्या बंगाली बाभळी महेशदादा गणगणे यांच्या मार्गदर्शनात तोडण्यात आल्या त्यावेळी.कर्तव्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शिवराम डिक्कर, ऋषिकेश म्हैसने, शिवा वानखडे, स्वप्निल डोबाळे, शुभम म्हैसने, प्रभाकर म्हैसने, योगेश डोबाळे, गोपाल वानखडे, महेश डिक्कर, मयूर सपकाळ, शिवशंकर म्हैसने, विनोद डिक्कर, ज्ञानेश्वर खोंड, निकेश म्हैसने,प्रवीण म्हैसने, विवेक डोबाळे, सुमित म्हैसने, विठ्ठल वसू, अमोल वानखडे, दिनेश वानखडे,शेखर म्हैसने यांनी मदत केली.