युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मनोज सोनकुकरा यांची निवड

138

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 12 ऑगस्ट कोरची शहर युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी मनोज प्रताप सोनकुकरा यांची निवड करण्यात आली. सदर निवड आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केली. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा नगरसेवक मनोज अग्रवाल, आरमोरी विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष कमलेश बारस्कर, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस महासचिव धनराज मडावी, निलेश अंबादे उपस्थित होते. त्याबद्दल सोनकुकरा याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सोनकुकरा यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी आमदार आनंदराव गेडाम, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव मनोज अग्रवाल, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामलाल मडावी, कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत हरडे यांना दिले आहे.