दुधमाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले १३१ वि पुण्यतिथी साजरी

 

धानोरा /भाविक करमनकर

धानोरा तालुक्यातिल दुधमाळा येथे क्रांतीविर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३१वी पुण्यतिथी दुधमाळा येथे माळी समाजाच्या वतिने सुनंदाताई तुलावी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आलि. पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून गोर गरीब आणि अपंग व्यक्तीनां स्वेटर वाटप करन्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहूने म्हणून देवानंद भेंडारे माळी समाज संघटना धानोरा ,मंदाताई उईके ग्रा.प.सदस्या लताताई उईके पो.पाटिल दुधमाळा सुनंदाताई निकुरे ग्राम पंचायत सदस्य ,वैभव मडावी ग्रा.सदस्य ,श्री वसंत गुरनुले माळी समाज अध्यक्ष दुधमाळा,नानाजी मोहुर्ले मा.स.सचिव ,साईनाथ गुरनुले ,तुळशिराम कोकोडे ,मधूकर उईके यासह गावकरी तसेच माळी समाज दुधमाळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारसिंगे सर पल्लवि विद्यालय दुधमाळा यांनी केले,संचालन तुषार कोकोडे यांनी तर गुरुदेव वाढई यांनी आभार मानले