बेलोरो वाहन पलटले एकाचा मृत्यू तर 10 किरकोळ जखमी

 

सावली (सुधाकर दुधे )
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावरील कठड्याला धडक देऊ बेलोरो वाहन क्रमांक एम पी 50 बीसी 11 78 पलटले. यात एकाचा मृत्यू झाला तर 10 मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मध्यप्रदेशातील 11 कामगार करीमनगर जिल्ह्यातील डूबा येथे दोन महिन्यापूर्वी पोटाची खड्गि भरण्यासाठी मजुरीच्या कामावर गेले होते. काम आटोपून आपल्या स्वगावी परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सदर वाहन वैनगंगे च्या तीरावर असलेल्या कठड्याला धडक देऊन पलटले. यात 11 प्रवासी जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर वृत्त लिहीपर्यंत मृतकाचे व जखमीचे नाव कळू शकले नाही. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत