साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना “समाजभूषण पुरस्कार-२०२१” जाहीर, जळगाव येथे ५ डिसेंबर ला होणार सन्मानित.

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली सारख्या आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गट साधन केंद्रात कार्यरत असलेले उपक्रमशील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगावच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार’-२०२१ ने जळगाव येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, त्यांच्या पत्नी सौ वाघ व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात येणार आहे.
चांगदेव सोरते यांनी कोरोना कालावधीत स्थलांतरित कुटुंबातील पालकांना त्यांच्या कुटुंबापर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तसेच शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे.नियमित विद्यार्थी-शिक्षक यांना शैक्षणिक सहाय्य करण्याचे मौलिक कार्य केले आहे.आतापर्यत अनेक शिक्षक प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.महाराष्टातील जवळपास बारा जिल्ह्यातील शिक्षण परिषदांना त्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत.त्यामध्ये गुरू गौरव,भामरागड भुषण,आयकाॅन ऑफ साऊथ गडचिरोली,प्रेरक अधिकारी,गुणवत्तेचे शिलेदार, आदर्श साधनव्यक्ती,राज्य स्तरीय अध्यापक पुरस्कार,बालरक्षक, इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड सारखे इत्यादी पुरस्कार देऊन सोरते यांचा गौरव केल्या गेला आहे.
त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,विद्यार्थी शिक्षक पालक,अधिकारीगण, सामाजिक संस्था,आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना दिले आहे.