Home Breaking News तिरंगा मास्कवर लावल्याने सोशल मीडियावर नाराजीचा सूर

तिरंगा मास्कवर लावल्याने सोशल मीडियावर नाराजीचा सूर

330

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचा तिरंगा भारतीयांचा अभिमान आहे या तिरंग्यासाठी आज भारत सीमेवर जवान आपला प्राण देतोय. आणि याच तिरंग्याचे मास्क बाजारात विकले जाणार, आपण ते खरेदी करणार मास्क बांधून त्यावर शिंका देणार, त्यावर थुंकी लागणार वापर करून आपण ते कोठेही फेकून देणार असे मास्क वापरणे मध्ये कुठे ही फेकून देणे हा त्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मास्क तयार केले जाऊ नयेत व लोकांनी ते विकत घेऊ नये अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील अशा आशयाचे संदेश फिरत आहेत. खास करून तरुण पिढीत नाराजीचा सूर दिसत आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleघुग्घुस परिसरात पुन्हा एक कोरोना पॉजिटिव
Next articleयुवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मनोज सोनकुकरा यांची निवड