दखल न्युज भारत कडून कार्यकारी संपादक श्री. दिनेश बनकर यांचा सन्मान! कर्तव्यदक्ष पत्रकार या कार्यासाठी सन्मान!

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

दखल न्युज भारतचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे,दखल न्युज भारतचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या हस्ते कार्यकारी संपादक दिनेश जी बनकर यांचा सन्मानपत्र देऊन आनंदमय वातावरणात सस्नेहपुर्वक चंद्रपूर येथे सन्मान करण्यात आला.

जीवन जगत असतांना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी कशाप्रकारे हाताळायच्या आणि त्या अडचणीवर कशाप्रकारे मात करायचं तद्वतच जीवनात संघर्ष करून पुढे कसं जायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्यकारी संपादक श्री दिनेश जी बनकर सर, कारण त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून स्वतःचे एक आदराचे, मानाचे, स्थान आपल्या निस्वार्थ भावणेतुन कार्यतत्परतेने जनमानसात निर्माण केले आहे. आणि त्याचीच एक पावती म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दखल न्यूज भारतच्या कार्यकारी संपादक या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज कार्यकारी संपादक पदाची धुरा योग्यरीत्या सांभाळत आहेत. त्यांचा हा यशस्वी जीवन प्रवास नेहमी आनंद द्विगुणित करून वाटचाल करीत राहो.

दखल न्यूज भारत चे कार्यकारी संपादक श्री. दिनेश बनकर यांच्या विविधांगी व सर्वसमावेशक रित्या काम करण्याची पद्धत पाहून, दखल न्यूज भारत कडून त्यांच्या कार्य प्रती आदर म्हणून त्यांना सन्मान पत्र बहाल करून दखल न्यूज भारत कडून त्यांचा सन्मान करण्यात आला.