घुग्घुस परिसरात पुन्हा एक कोरोना पॉजिटिव

541

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

घुग्घुस परिसरात बुधवार ला पुन्हा एक युवक कोरोना पॉजिटिव आढळून आला. घुग्घुस पासून जवळच असलेल्या नकोड़ा येथील वार्ड क्रमांक 4 कॉलोरी क्वार्टर परिसरातील 35 वर्षीय सदर व्यक्ति पॉजिटिव आढळून येताच वार्ड क्रमांक 4 चा सम्पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
सदर परिसर सील करताना स्थानिक लोकांनी प्रशासनास विरोध केला मात्र विरोधास न जुमानता परिसर सील करण्यात आला. त्यामुळे परिसरात थोड्या काळ साठी तनाव निर्माण झाला होता. आज मिळून आलेल्या या रुग्नमुळे घुग्घुस परिसरातील कोरोना बाधित लोकांची संख्या 18 झाली असून मोठया प्रमाणात कोरोना च्या या संखेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.