मानव समाज संघटनातर्फे संविधान दिन साजरा शहर पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार

 

अकोट प्रतिनिधी

संविधान गौरव दिनानिमित्त मानव समाज संघटनेतर्फे शहर पोलीस स्टेशनला संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानव समाज संघटनेतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, ज्ञानोबा फड(तेल्हारा पो.नि),श्री जनार्दन शेवाळे साहेब, जयप्रकाश पांडे, विजय जितकर श्रीमती विल्हेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठोंबरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे म्हणाले की आपले सर्वसमावेशक संविधान हाच आपल्या यशस्वी लोकशाहीचा पाया आहे.संविधानाने प्रदान केलेले मूलभूत हक्क उपभोगतांना आपल्या मूलभूत कर्तव्याप्रतिही नागरिकांनी तितकेच जागरूक असले पाहिजे.नैतिकता, शील,कर्तव्य, व जबाबदारी हे आपल्या आचरणात आणायचे असतील तर संविधान वाचायला हवे त्यानंतरच समाजात सुजाण, जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण होणार आहे.
या कार्यक्रमाला अकोट शहर पोलीस स्टेशनचे बहुतांश कर्मचारी हजर होते.
कार्यक्रमाच्या सरतेशेवटी २६/११ रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मानव समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाई सेजपाल,डॉ.गुंजन वालसिंगे,राजकुमार भगत,रतन पळसपगार,महेश देव, राजेश तायडे, राहुल वानखडे,सागर वसू, संदीप वालसिंगे,ऋचा ठाकूर, नम्रता कोल्हटकर, हर्षलता नाथे,(सर्व विधिज्ञ वर्ग),निखिल राजगुरू, प्रतीक संघानी,कु यज्ञा देव, कु अर्शिता वडणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. रतन पळसपगार, सूत्रसंचालन महेश देव तर आभार प्रदर्शन विजय जितकर यांनी मानले.