Home गोंदिया आज कोरोनाचे 25 नवे रुग्ण 24 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत...

आज कोरोनाचे 25 नवे रुग्ण 24 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 8 रुग्णांचा मृत्यू

244

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज..
गोंदिया दि.12 दिवसेंदिवस जिल्ह्यात विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बाधित रुग्ण दररोज आढळून येत आहे. आज 12 ऑगस्ट रोजी 25 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. तर 24 रुग्ण कोरोनातुन बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 708 झाली आहे. क्रियाशील रुग्ण संख्याही वाढतच आहे. क्रियाशील रुग्ण संख्या आता 253 झाली आहे.

जिल्ह्यात आज जे 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे, त्यामध्ये गोंदिया तालुक्यात 11 रुग्ण आढळले असून यामध्ये न्गोंदिया येथील यू लक्ष्मीनगर-1, अदासी तांडा-1, झिलमिली-1, नागरा-2, रायपूर (दासगाव)-1, गोंदिया सिव्हील लाईन-2, लोहा लाईन-1, दुर्गा चौक-1 व कुंभारेनगर-1.

सडक/अर्जुनी तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले असून सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.14 मध्ये एक व बामणी येथे एक. तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये शहिद मिश्रा वार्डामध्ये दोन, सुभाष वार्डमध्ये एक, डोंगरगाव/खडकी येथे एक, बिरसी येथे एक रुग्ण

आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथे दोन, बोधा येथे एक, किंडगीपार येथे एक, गणेशपूर येथे एक व आमगाव येथे एक. सालेकसा तालुक्यात गिरोला येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

कोरोनातून जे 24 रुग्ण बरे झाले त्यांना आज सुट्टी देण्यात आली. यामध्ये गोंदिया तालुक्यातील चौदा रुग्ण असून सिंधी कॉलनी-7, रेलटोली-5, हनुमान नगर-1 व पुनाटोली एक रुग्ण आहे. सालेकसा तालुक्यातील एक, तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे एक. आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील-3. सडक/अर्जुनी तालुक्यातील 4 रुग्ण असून त्यामध्ये खडीपार-1, रेंगेपार-1 लेंडेझरी-1, सडक/अर्जुनी-1. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील कोसंबीटोला येथील एक रुग्ण आहे. आतापर्यंत 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 11790 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 10886 नमुने निगेटिव्ह आढळून आले. 583 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. 122 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे. तर 199 नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

गोंदियाच्या प्रयोगशाळेतून 583 आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून 120 व पाच रुग्ण हे जिल्ह्याबाहेर आढळले आहे. असे एकूण 708 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 227 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 959 व्यक्ती अशा एकूण 1186 व्यक्ती विलगिकरणात असून या सर्व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून उपचार करीत आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 5720 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये 5600 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.120 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 8 मृत्यू झाले आहे. त्यामध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार-1, रेलटोली-1, न्यू लक्ष्मीनगर-1. सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडडशिवनी येथील एक. तिरोडा तालुक्यातील गराडा-1, पाटीलटोला-1, बिरसी येथील दोन रुग्णाचा समावेश अहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 216 चमू आणि 122 सुपरवायझर 110 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र जिल्ह्यात 110 आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,रेलटोली, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली, क्षत्रिय मार्ग श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला, गोरे, शारदानगर, आमगाव/खुर्द, सिंगलटोली, न्यू पोलीस कॉलनी. देवरी तालुक्यातील भागी,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक 5,7,9,10,15,16 आणि 17. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.14, सौंदड येथील गांधी वार्ड, कोहळीटोला,रेंगेपार,खाडीपार व मडीटोला.आमगाव तालुक्यातील तिगाव, चिरचाळबांध, बनगाव, डोंगरगाव, पदमपूर-1 पदमपूर-2, रिसामा, कुंभारटोली, शिवनटोली, रिसामा-2, आमगाव शहरातील भवभूती वार्ड, फ्रेन्ड्स कॉलनी वार्ड क्र.3 व 4 चा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बिरसी 1 व 2, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी बाजार चौक, घोघरा, सरांडी, घोघरा-२, वडेगाव-२,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, खोलगाव, सालेबर्डी, खैरलांजी, न्यू बेलाटी/खुर्द, बेलाटी/खुर्द-2, मुंडीकोटा बाजार चौक, सरांडी-2, सर्रा, कवलेवाडा, बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, नेहरू वार्ड, महात्मा गांधी वार्ड, लक्ष्मी वार्ड, रविदास वार्ड, शाहिद मिश्रा वार्ड, महात्मा फुले वार्ड, लक्ष्मीनगर, बेलाटी/खुर्द, गांधी वार्ड, प्रगतीनगर, किल्ला वार्ड, मुस्लीम टोली आदीचा समावेश आहे.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार, तेढा व तुमखेडा आदींचा समावेश अहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

Previous articleकोरोनावर मात करण्यासाठी दिली अनोखी सलामी; खेर्डीतील विनोद भुरण मित्र मंडळाने रक्तदान शिबिराचे केले होते आयोजन
Next articleमुंबईत अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – पालकमंत्री आदित्य ठाकरे