छत्रपतींच्या स्मारकनिर्मितीचे काम तालुकास्तरावर शिवसैनिकांनी हातात घ्यावे खासदार भावना गवळी : शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींना आवाहन

0
101

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर- देशामध्ये ऐतदेशीयांचे पहिले स्वराज स्थापन करणार्‍या कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्य अठरा पगड जातींना सुरक्षितता व सन्मानाची वागणूक देणारे होते. या पहिल्या स्वतंत्र्य शिवराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवरायांचे स्मारक प्रत्येक तालुकास्तरावर तयार करण्यासाठी शिवसैनिक व पदाधिकारी तसेच शिवप्रेमीं यांनी प्रयत्न करावेत, शिव स्मारकापासून स्मृती घेवून पुढील पिढी चारित्र्य संपन्न व देशाभिमानी घडेल असे आवाहन वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज या देशातील शोषीत, पिडीत समाजाचे मानबिंदू आहेत. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या शिवराज्यमध्ये प्रत्येक नागरिक सुखी समाधानी होता. शिवराज्यात स्त्रियांना बरोबरीचे व सन्मानाचे स्थान होते. आपल्याला पुढची पिढी अशीच चारित्र संपन्न घडवायची असेल तर शिव विचाराशिवाय पर्याय नाही यासाठी वाशीम-यवतमाळ मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिक, शिवसेना नगरसेवक, शिवसेना नगराध्यक्ष व पदाधिकारी शिवप्रेमींनी तालुकास्तरावर छत्रपती शिवरायांचे भव्य शिवसृष्टीसाठी पुढाकार घेेणे गरजचे आहे. यासाठी शासकिय स्तरावर पाठपुरावा करण्यास आपण तयार असून छत्रपतींच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे व पुढच्या पिढीसाठी शिवविचाराची शिदोरी निर्माण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेही त्या म्हणाल्या.

कर्नाटक सरकारचा निषेध
कर्नाटक राज्यामध्ये तेथील राज्य सरकारने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्याचा अताताईपणा केला आहे. यामुळे संपूर्ण देशातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना याविरोधात आंदोलनात उतरली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जोपर्यंत मुळ जागेत स्थापित केला जात नाही. तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कर्नाटक सरकारला शिवसेनेच्या आंदोलनाची जाणिव आहे. पुतळा स्थापित झाला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलनने आंदोलन करेल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206