नरसिंहपूर येथील शेतकरी झाले आक्रमक शेती पपाची वीज  चालू नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 

 

नीरा नरसिंहपूर:  प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील शेतकरी महावितरण कंपनीच्या विरोधात आक्रमक.मा सरपंच आण्णासाहेब काळे मा. सरपंच विलास ताटे, विजय सरवदे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सरवदे, सचिन कदम, या सर्वांच्या प्रयत्नाने धाडशी पुढाकार घेऊन टणु तालुका इंदापूर येथील 33 /11 (3) किवी महावितरण कार्यालया समोर शेकडो शेतकरी बांधवांच्या उपस्थित धडक मोर्चा घेऊन आंदोलन करण्यात आले. शेती पंपाची वीज पहिल्यासारखी सुरळीत चालू करून मिळावी व इलेक्ट्रिक पंपाची वाढलेली एचपी कमी करून मिळावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आक्रमक होऊन येथील महावितरणचे कर्मचारी सीनियर वायरमेन रामहरी राजपूत यांना यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचने नुसार शेतकऱ्यांच्या मागणीचे पत्र देण्यात आले. सदर आंदोलनाला उपस्थित आसलेले ग्रामस्थ धनंजय पवार, आण्णासाहेब फडतरे, राजेंद्र बळवंतराव, बापू जगदाळे, उपस्थित राहून

सदर या भागातील शेतकऱ्यांचा महावितरण कंपनीने विचार न केल्यास इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचा महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याला इशारा.

——————————————

 फोटो :-ओळी- टणु तालुका इंदापूर येथील महावितरण कार्यालयाला निवेदनाची प्रत देत आसताना शेतकरी संघटना.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160