रत्नागिरित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर व तालुका दहीहंडी उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला…..!

0
104

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी :- यावर्षी संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यासाठी जिल्हा प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. याच कारणामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा न होता साध्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे मोठ्या दिमाखदार स्वरूपात विविध स्पर्धा आयोजित करून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी दहीहंडी उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला नाही. या औचित्याने राष्ट्रवादीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने सोशल डिस्टंसिंग व मास्क यांचा वापर करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा पक्षाचे नेते सुदेश मयेकर, शहराचे नेते तथा भावी नगरसेवक अभिजित उर्फ मणू गुरव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन (बंटी) वणजू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, महिला शहर अध्यक्ष नेहाली नागवेकर, शहर सरचिटणीस रणजित शिर्के, उद्योजक लिलाधर शेठ नागवेकर, प्रशांत परब, दादा भाटले, बापू तोडणकर आदी उपस्थित होते….!

*दखल न्यूज भारत*