प्रतिनिधी / निलेश आखाडे.
रत्नागिरी – १२ ओगस्ट रोजी केंद्र आणि राज्य सरकारने गोरगरीब , कामगार , कष्टकरी ,मजूर आणि छोट्या वाप-यांचे कोरोनाच्या नांवाने चालविलेले शोषण आणि उपासमारीतून त्यांना भयमुक्त जिवन जगता यावे , हाताला रोजगार मिळविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार रत्नागिरी एस.टी डेपो येथे प्रभावीपणे डफडे बजावो आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी बस आगाराकडून ग्रामिण भागातील बस सेवा सूरु करण्याबाबत उदासीनता दाखविल्या मुळे प्रवाशांचे प्रंचड हाल होत आहेत याची दखल घेत वंचित बहूजन आघाडी रत्नागिरी तालुक्याच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने रत्नागिरी बस आगारामध्ये सकाळी डफली बजाओ आंदोलन करुन शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच आगार प्रमुखांना आणि रत्नागिरी जिल्हाधिकारि यांना निवेदन देऊन त्वरित बससेवा सुरू करण्याची मागणी केली गेली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशील जाधव जिल्हा सहसचिव सिद्धार्थ सावंत तालूका सचिव मुकुंद सावंत तालुका संघटक अलमिया काजी, विशाल जाधव तसेच वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दखल न्यूज भारत