डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात संविधान दिन साजरा

 

उमेश कांबळे ता प्र-

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. विवेक शिंदे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. कार्तिक शिंदे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव उपाध्यक्षपदी, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पाहुणे आणि यशवंतराव शिंदे महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. प्रशांत पाठक प्रमुख वक्ते म्हणुन व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, डॉ.कार्तिक शिंदे सचिव , डॉ. प्राचार्य जयंत वानखेडे आणि प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत पाठक यांनी दीप प्रज्वलित करून आणि संविधान वाचन करून सुरवात केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. विवेक शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा दंडु हिने करुन दिला.
डॉ. जयंत वानखेडे यांनी संविधानाची निर्मिती कशी करण्यात आली हे आपल्या शब्दातून मांडले. डॉ. कार्तिक शिंदे सर यांनी संविधानाला डॉ. बाबासाहेबानी आपल्या लोकशाहीचा आत्मा का म्हटले याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या सर्वांच्या मनोगत नंतर प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत पाठक यांनी संविधानाची निर्मिती कश्या प्रकारे करण्यात आली याची सर्व रूपरेखा आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात आलेले संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे सर यांनी २१ व्या शतकात संविधान कश्या प्रकारे आपल्या भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवत आहे यावर आपले मनोगत सांगितले. कार्यक्रमाचे आभार हे डॉ. रमेश नगराळे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यात महाविद्यालयातील प्राध्यापक निमजे मॅडम, लांडगे सर आणि इतर सर्वांनी योगदान दिले.