पोळ्याचा सण नागरिकांनी घरीच साजरा करावा, एकत्र जमू नये, श्री अभिजित अहिरराव

721

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
सध्या सर्वत्र कोविड 19 (कोरोना)या आजाराने कहर केला आहे शहर ग्रामिण ,जिल्हा सर्वच ठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत आहेत कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने गाईड लाइन दिलेल्या आहेत
शेतकरी बांधव व नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा हा सण या आठवड्यात येत आहे दि 18 ऑगस्टला पोळा व 19 ऑगस्टला तान्हा पोळा आहे या सणासोबत सर्व नागरिकांच्या धार्मिक भावना जुळल्या आहेत परंतु आजची परिस्थिती कोरोनामुळे नेहमीपेक्षा वेगळी आहे
खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी पोळ्याच्या सणाला एकत्र येऊ नये शेतकरी बांधव व नागरिक यांच्यासाठी महत्त्वाचा असलेला हा सण कोरोना संक्रमण निर्बंध करण्यासाठी आपापल्या घरीच साजरा करावा एकत्र येण्यास वरिष्ठ स्तरावरून निर्बंध आहे करिता या सणासाठी कुणीही एकत्र येऊ नये व सर्वांनी शांततेत पोळा सण साजरा करुन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अभिजित अहिरराव यांनी केले आहे