कूषिदूताकडून शेतकय्रांना मार्गदर्शन

110

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

लॉकडाऊन मध्ये सर्व शैक्षणिक आस्थापने शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्क-फ्रॉम-होम पद्धतीने शैक्षणिक कार्य सुरू आहे .याच पार्श्वभूमीवर श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी निखिल मदन इंगळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील किनखेड (पूर्णा) या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची सुपीकता व मातीतील इतर घटक आपण कसे पण करू शकतो तसेच रासायनिक फवारणी मुळे होणारे नुकसान यांचे मार्गदर्शन केले. तसेच मित्रकीटकांची ओळख व त्यांचे महत्त्व पटवून दिले.यावेळी गावातील शेतकरी दादाराव इंगळे, मदन इंगळे, रामकृष्ण ढोरे, गणेश इंगळे, रामराव काकर, राजेंद्र लांडे, रामकृष्ण अंधारे व इतर शेतकरी उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम खरडे आणि कार्यक्रम अधिकारी सुरज चांदुरकर व कार्यक्रम समन्वयक वैभव इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.