चोहोट्टा बाजार येथे वंचित बहुजन आघाडीचे ढपळी बजाव आंदोलन

128

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

वंचित बहुजन आघाडी मार्फत बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आज दिनांक १२ आॅगस्ट रोजी चोहोट्टा बाजार परिसरात मंगेश ताडे भारिप बहुजन तालुका महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ढपळी बजाव आंदोलन करण्यात आले.यामध्ये सरकारने जे लाॅकडाऊन चालू केले त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची पाळी आली.तसेच कर्मचारी वर्ग यांना दुसरे व्यवसायाचे साधन उपलब नसल्या कारणाने आज बस सुविधा पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू कराव्यात या उद्देशाने आज ढपली बजाव आंदोलन काढण्यात आला .
या मध्ये उपस्थित .भारिप बहुजन तालुका महासचिव मंगेश ताडे चोहोट्टा बाजार सर्कल अध्यक्ष उमेश खंडारे , मुस्ताक शाहा,सुरेंद्र ओइंबे, तालुका संघटक,शंकरराव घुगरे सरपंच पंकज पाखरे, सुदर्शन किरडे(सरपंच करतवाडी) श्रीकृष्ण लांडे, बळीराम भांडे,संदीप वडाल, विजय दामोधर,युवराज मुरकुटे ( सर्कल अध्यक्ष कुटासा) मुकदर शाह,सुलेमान शाह,शाहरुख शाह,राहुल लावडे,( ता.युवक अध्यक्ष आकोट) विष्णू वडाल,गजानन दाबेराव.(मा.जिल्हा परिषद. सदस्य)नीलेश बगाडे तालुका प्रसिध्दी प्रमुख गणेश बुटे लखन ओइंबे .आदी उपस्थित होते.