ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
आरमोरी दि 12 ऑगस्ट-
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने व रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वा तालुकास्तरावर कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनानिमित्य एकदिवशीय रानभाजी महोत्सव तालुका कृषि अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले.या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन व रानभाजी मोहत्सव पुस्तकाचे प्रकाशन आ.कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तेव्हा मा मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष न प देसाईगंज शालूताई दंडवते नगराध्यक्षा न प देसाईगंज , रेवताताई अलोने सभापती प स देसाईगंज,मा सलाम गट विकास अधिकारी प स देसाईगंज, मनोहर डांगे , लालाभाऊ रामटेके, मा निलेशजी गेडाम तालुका कृषी अधिकारी,मा महेंद्र दोनाडकर बी टी एम वडसा,मा मेश्राम साहेब मंडळ कृषी अधिकारी वडसा,योगेश रणदिवे कृषी सेवक ,श्री ताडपल्लीवार कृषी से,यशवंत जी कुंभरे कृषी सेवक ,कु ठाकरे मॅडम कृषी सेवक कु बडोले मॅडम,हेमलताताई दोनाडकर कृषी सेवक,तसेच तालुक्यातील महिला बचत गट येथील महिला कृषी मित्रा शेतकरी उपस्थित होते.
रानभाजी महोत्सवांमध्ये आजच्या स्थितीत आहारात फारच ठराविक भाज्या असतात जसे कांदे,बटाटे ,वांगे इत्यादी आणि पालेभाज्यांमध्ये पालक आणि मेथी पलीकडे फारशी माहिती शहरी लोकांना नाही याउलट ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जीवनात आणि जेवनात मात्र विशेषता खरिपात अर्थात पावसाळी हंगामात भरपूर विविध प्रकार असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्य सुद्धा चांगले राहते. या या रानभाज्यांमधे औषधी गुण सुद्धा असल्याने त्याचा फायदा चांगले आरोग्य राखण्यास होतो. याचा फायदा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी कृषी विभागाकडून प्रथमच देसाईगंज येथे उपक्रम राबविण्यात आला.
रानभाज्यांच्या महोत्सवात जे प्रकार आता पुरेसे उपलब्ध आहेत अशा भाज्या विक्रीस उपलब्ध असतील यामुळे ग्रामीण भागातील रानभाज्यांच्या विविधता बाबत नागरिकांना ओळख होईल. आणि शिवाय शहरातील नागरिकांना या भाज्यांची ओळख झाल्याने,त्यांचे कडून भाज्यांची मागणी झाल्यास,असा भाजीपाला शेतकरी उत्पादित करतील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आ.कृष्णा गजबे यांनी शेतकरी वर्गांना सांगितले.
कोरोना संसर्ग काळामध्ये सामाजिक अंतर राखून मास्क चा वापर करून, परिसराचे निर्जंतुकिकरन इत्यादी सुरक्षेची विशेष खबरदारी घेऊन राणभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.