15 आँगस्ट पुर्वी लाँक डाऊन ना उठविल्यास संपुर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे उग्र आंदोलन -आ. बाळासाहेब आंबेडकर नागपुरातील व्यापाऱ्यांनो समोर येऊन दुकाने हाँटेल सुरु करा, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ- आ. बाळासाहेब आंबेडकर

 

सुनील उत्तमराव साळवे (9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

सिताबर्डी / नागपुर 12 आँगस्ट 2020
केंद्र व राज्य शासनाने मागील 4 महिन्यापासून लावलेले लाँक डाऊन आता उठविण्याची आवश्यकता आहे. मागच्या वर्षी विविध आजारांनी मरणाऱ्यांची संख्या ही मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त आहे. तसेच सध्या चा डेथ रेशों हा 2 % च्या आसपास आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आता पुर्वीसारखे दैनंदिन व्यवहार सुरु करु द्यावे विनाकारण लाँक डाऊन लादुन सामान्यांना म्रृत्यु च्या खाईत धकलु नका. 15 आँगस्ट पुर्वी जर हे लाँक डाऊन हटवावे. लाँक डाऊन ना हटविल्यास आम्ही संपुर्ण राज्यभर उग्र आंदोलन सुरू करु असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडी चे नेते आ. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज नागपूर येथे झालेल्या डफली आंदोलनात दिला.
नागपुर च्या मोरभवन(बर्डी) बस स्थानकांपुढे आज शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात डफली घेऊन राज्य व केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. दुपारी 1 वाजता वंचित बहुजन आघाडी चे नेते आ. बाळासाहेब आंबेडकर यांचे या आंदोलन स्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी बैंड व डफली च्या गजरात सरकारविरोधात गजर केला. स्वतः आ. बाळासाहेब आंबेडकर यांनी हातात डफली घेऊन वाजवली. यावेळी बोलताना आ. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना मध्ये आता सुधारणा करण्याची गरज आहे. कोरोना विरोधात लढण्याची 80% जनतेची तयारी आहे. यापैकी 95%नागरिक उपचार घेऊन घरत परतत आहेत. केवळ 5% लोक Vulnerable आहेत, ज्यांना अद्ययावत उपचार देऊन ही बळी पडत आहेत. त्यामुळे या 5% लोकांसाठी 95% लोकांना सरकार का वेठीस धरत आहे? एकीकडे परप्रांतात जाण्यासाठी ट्रेन, बसेस सुरु आहेत पण राज्यात जिल्हाबंदी आहे हे विचित्र आहे. खाजगी बससेवा, वाहन सेवा सरकारने सुरु केली आहे. मात्र यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. 800 रुपये भाड्यासाठी 4-5 हजार रुपये खर्च खाजगी वाहन चालक आकारत आहेत. हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरु करावी. आँफिस, हाँटेल, मार्केट सर्व पुर्वीसारखे सुरळीत करावे मागील 4 महिन्यापासून सुरू असलेल्या लाँक डाऊन मुळे गोरगरीब मजुर व नागरिकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. निराशेपाई नागरिक आत्महत्या कडे वळतील. लाँक डाऊन हा नेहमीसाठी पर्याय नाही.
नागपुरातील दुकानदार, व्यावसायिक, आँटोरिक्शा वाले यांना मी दिलासा व भरोसा द्यायला आलो आहे. तुम्ही सर्व समोर या आणि आपापले दुकाने सुरु करा. मी आपणास राजकीय व कायदेशीर संरक्षण देईल. तुम्हाला कोणी हात लावणार नाही याची मी ग्वाही देतो.सरकारने राज्यातील बेस्ट सेवा, एस टी महामंडळ च्या बसेस तसेच स्टार बसेस सुरु लवकरात लवकर कराव्यात. येत्या 15 आँगस्ट पुर्वी केंद्र व राज्य सरकारने लाँक डाऊन उठवावे अन्यथा संपूर्ण राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा आज नागपुरात आ. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक राजुभाऊ लोखंडे, नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे, डॉ. रमेश गजबे(पुर्व विदर्भ समन्वय समिती अध्यक्ष), इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, शंकर बुरबुरे, माजी तहसीलदार धर्मेश फुसाटे, संजय हेडाऊ, नागपुर महिला शहर अध्यक्ष वनमालाताई ऊके, मायाताई शेंडे, नालंदा गणवीर, नंदिनी सोनी, सुजाता सुरडकर, नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर,महासचिव अजय सहारे, नितेश जंगले, सुमेध गोंडाणे (प्रवक्ता नागपुर जिल्हा ग्रामीण), आनंद चवरे, बबनराव वानकर, अंकुश मोहिले, सुनील इंगळे, अविराज थुल, पं. स. सदस्य सुधीर करंजीकर(दवलामेटी), राजेश जंगले, भरत लांडगे, उमेश बेंडेकर, सुमेधु गेडाम (पुर्व नागपुर), कमलेश सहारे ई. वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.