मंगरुळपीर येथे वंचीत आघाडीचे डफडे बजाव आंदोलन

0
96

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर– केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ता १२ रोजी डफडे वाजवण्याचे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा व ईतर वाहने सुरू झाले पाहिजे. या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले.राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन एसटी डेपो समोर डफडे वाजविण्याचे आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनाला याबाबत निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भारीपचे तालुका अध्यक्ष शंकर तायडे,शहराध्यक्ष सौरभ सपकाळ,गजानन इंगोले,विनोद भगत,समाधान भगत, जनार्दन बेलखेडे,संतोष लांभाडे,गोपाल सुर्वे,गौतम खाडे,दिवाकर चक्रनारायण आदिंची उपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206