मंगरुळपीर येथे पोलीसांना राख्या बांधुन रक्षाबंधन साजरा

122

 

 

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-पोलिस स्टेशनमध्ये जावुन राष्टवादी काॅग्रेसच्या पदाधिकारी महिलांनी पोलीसांना राख्या बांधुन रक्षाबंधन साजरा केला.
कोरोणाच्या पार्श्वभुमीवर वाशिम जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्याही रद्द केल्याने रक्षाबंधन सारख्या पविञ सणाला पोलिस दादा आपल्या बहिणीकडे राखी बांधन्यासाठी जावु न शकल्याने राष्टवादी काॅग्रेसच्या वतीने पोलिसांना राख्या बांधुन बहीणीची ऊणीव पदाधिकारी महिलांनी भरुन काढल्याने पोलिसांनीही समाधान व्यक्त केले आहे.नेहमी सामाजीक ऊपक्रम राबवनार्‍या रा.का.पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी रक्षाबंधनाचे हे अनोखा ऊपक्रम राबवल्याने सर्वञ कौतुक होत आहे.या ऊपक्रमासाठी राष्टवादी काॅग्रेसच्या कार्याध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी आनंद राऊत, युवती जिल्हाध्यक्षा नूतन राठोड,युवक जिल्हाध्यक्ष अनंता काळे,युवक जिल्हा ऊपाध्यक्ष विशाल धानोरकर,वैभव व्यवहारे,श्रध्दा ठाकरे,गुणवंता ठाकरे आदी पदाधिकारी ऊपस्थीत होते.याप्रसंगी भाजीपाला दुकानदारांना मास्क आणी सॅनिटायझरचेही वाटप करन्यात आले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206