इंदापुर तालुक्यातील शिवभक्त व शिवसैनिकांनी इंदापुर नगरपरिषदेसमोर कर्नाटक सरकार विरोधात जाहीर निषेध करत आंदोलन केले. 

 

 

इंदापूर तालुका प्रतिनीधी : दिनांक 12 बाळासाहेब सुतार

कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावामधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा रात्रीच्या अंधारात पोलीस बळाचा वापर करत दोन दिवसांपुर्वी हटवला, सदर कृतीचा निषेध करण्यासाठी व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने परत त्याच जागी बसवण्यात यावा या मागणीसाठी इंदापुर तालुक्यातील शिवभक्त व शिवसैनिकांनी इंदापुर नगरपरिषदेसमोर कर्नाटक सरकार विरोधात आज आंदोलन केले.

शिवसेना जिल्हा समन्वयक विशालदादा बोंद्रे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,तालुका समन्वयक अरूण पवार ,इंदापुर शहरप्रमुख महादेव सोमंवशी, माथाडी कामगार सेनेचे दुर्वास शेवाळे, शाखा प्रमुख रविराज पवार शाखा प्रमुख अवधूत पाटील,  दिपक शिंदे, रमेश शिंदे, विकास खंडागळे, बाजीराव शिंदे इत्यादी उपस्थित होते.

________________________

फोटो:- ओळी – इंदापूर: इंदापुर तालुक्यातील शिवभक्त व शिवसैनिकांनी इंदापुर नगरपरिषदेसमोर कर्नाटक सरकार विरोधात जाहीर निषेध करत आंदोलन करतानां (छाया : कैलास पवार )

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160