गडचिरोली जिल्हयात 17 कोरोनामुक्त तर नवीन 26 बाधित

 

संपादक जगदीश वेन्नम

गडचिरोली (जिमाक) दि.12 ऑगस्ट : जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 17 जण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 7, आरमोरी 7 व चामोर्शी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. यातील गडचिरोली तालुक्यातील 7 जणांमध्ये 2 आरोग्य कर्मचारी, 2 जिल्हा पोलीस व 3 इतर नागरिकांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये 7 एसआरपीएफ जवान आहेत. तर चामोर्शी जयरामनगर येथील 3 जण कोरोनामुक्त झाले. या प्रकारे 17 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.

*नव्याने आज 26 बाधित* : नवीन 26 बाधितांमध्ये धानोरा येथील 16 सीआरपीएफ जवानांसह, अहेरी येथील 5 जण यामध्ये एक सीआरपीएफ व तेलंगणा प्रवास करून आलेले 4 इतर नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयातील एक डॉक्टर, व काल पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णाचे वडील असे दोघे कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरची तालुक्यातील दोघांमध्ये काल 4 वर्षाच्या पॉझिटीव्ह मुलाचे वडील बाधित असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील एक जिल्हा पोलीस बाधित आढळला आहे. त्यानंतर भामरागड तालुक्यातील मागील आठवडयात फळविक्रेता पॉझिटीव्ह आढळून आला होता त्याच्या संपर्कातील एकजण बाधित आढळून आला आहे. याप्रकारे आज 26 नवीन बाधित जिल्हयात आढळले.
यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 165 झाली तर आत्तापर्यंत 611 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्हयातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या 777 झाली.