मुरबाडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाओ आंदोलन!

106

 

मुरबाड -१२-सुभाष जाधव) केंन्द्र सरकार व राज्य सरकारने अनलाॕक थ्री मधे बहूतेक सेवा सूरु केल्या आहेत. राज्यातील बाजारपेठा,उदोगधंदे ,,व्यापार सुरु झाले आहेत. गेले चार महिने लोकांना लाॕकडाऊन मुळे रोजगार,कामधंदे नव्हते उपासमारीची वेळ आली होती. आता हळूहळू कुठेतरी रोजगार सुरु झाले असताना मुरबाड तालुक्याच्या ग्रामिण भागातून मुरबाड ,कल्याण ,ठाणे,मुंबई सारख्या ठिकाणी रोजगारासाठी जावे लागणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाची सोय उपलब्ध होत नाहीत मुरबाड बस आगाराकडून ग्रामिण भागातील बस सेवा सूरु करण्याबाबत उदासीनता दाखविल्या मुळे प्रवाशांचे प्रंचड हाल होत आहेत याची दखल घेत मुरबाड मधिल वंचित बहूजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज 12 ऑगस्ट रोजी मुरबाड बस आगाराच्या विरोधात सकाळी डफली बजाओ आंदोलन करुन शासनाचा जाहीर निषेध केला व आगार प्रमुखांना निवेदन देऊन त्वरित बससेवा सुरू करण्याची मागणी केली गेली. यावेळी रिपब्लीकन फेडरेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान पवार , वंचित बहुजन आघाडीचे मुरबाड तालुका नेते राजुभाई थोरात ,, भारिप चे तालुका अध्यक्ष शंकर गोहिल , कार्याध्यक्ष गुरुनाथ पवार , सुरेश चन्ने, मुरबाड शहराचे स्नेहल देसले ,अनंत दुध- साखरे,पुंडलीक जामघरे,लालू खरवार,प्रभाकर आहिरे, संजय जाधव व वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.