ऑनलाईन शिक्षणाची योग्य अंमलबजावणी व्हावी – पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील

 

निरा नरसिंहपुर दिनांक 12 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार 

शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आणि श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस.बी. पाटील वनगळी येथील ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भातील दि.9 ऑगस्ट रोजी झालेल्या परिषदेत पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

अंकिता पाटील म्हणाल्या की, ‘ यापूर्वी आपण मुलांना मोबाईल देत नव्हतो परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे आता सर्वकाही शिक्षण मोबाईल वरती होत असल्यामुळे आपण मुलांना मोबाईल देत आहे. सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचा  शिक्षणाचा “इंदापूर पॅटर्न” प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प असून ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कसे जाईल यासाठी कार्यक्षम प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी अनेक मान्यवर तज्ज्ञांनी अनेक विषयांवर इंदापूर तालुक्यातील ऑनलाइन शैक्षणिक विकासासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, एस. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण नेमाडे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज, नारायणदास रामदास हायस्कूल चे मुख्याध्यापक विकास फलफले, शिवाजी एज्युकेशन बावडा चे मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160