96 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2487 4 रुग्णांचा मृत्यू

0
249

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : काल सायंकाळपासून 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2487 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2 अशा 19 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1616 झाली आहे.

*पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल*
रत्नागिरी – 25
दापोली- 13
कामथे- 21
गुहागर – 26
देवरुख – 5
लांजा – 1
खाजगी प्रयोगशाळा 5 (चिपळूण – 1, खेड- 4)
आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्णांचा तसेच पुर्णगड, रत्नागिरी येथील 61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच खेर्डी, चिपळूण येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे.
मृत्यू चे प्रमाण 3.49 टक्के आहे.
*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 2487
बरे झालेले – 1616
मृत्यू – 87
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 784
सद्या 784 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आज संभाजीनगर, नाचणे, रत्नागिरी, नवलाईनगर नाचणे, रत्नागिरी, लक्ष्मी नारायणवाडी, कासरवेली, रत्नागिरी, जांभुळ फाटा, मिरजोळे, रत्नागिरी, भाटये मोहल्ला, रत्नागिरी, नागलेवाडी , आंम्बेशेत, रत्नागिरी,कुवारबाव, रत्नागिरी, बौध्दवाडी पोमेंडी बु, रत्नागिरी, निवळी तिठा, रत्नागिरी, करबुडे, मुळगांव, रत्नागिरी, शंकेश्वर मधुबन, माळनाका, रत्नागिरी, शासकीय कर्मचारी वसाहत, आरोग्य मंदीर, रत्नागिरी, जैन कॉलनी, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, सिध्दीविनायक चौक, कोकणनगर, रत्नागिरी, शिवतिर्थ अपार्टमेंट, तेली आळी, रत्नागिरी, बयाबी मंजिल, अदमापूर,रत्नागिरी, संजिवनी नगर, गोळप, रत्नागिरी, कारंवाचीवाडी, महालक्ष्मी मंदीर समोर, रत्नागिरी, निसर्ग वसाहत, शांतीनगर, रत्नागिरी, जयगड, सडेवाडी, रत्नागिरी, विनम्रनगर, नाचणे, रत्नागिरी, साईसिध्दी अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी, आठल्ये कॉम्प्लेक्स, गाडीतळ, रत्नागिरी, गोळप मोहल्ला, रत्नागिरी, रामविठ्ठल कॉम्प्लेक्स, टिळकआळी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
*ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन*
जिल्ह्यात सध्या 201 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 32 गावांमध्ये, दापोली मध्ये 12 गावांमध्ये, खेड मध्ये 42 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 95 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
*संस्थात्मक विलगीकरण*
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 43, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 51, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -21, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 157 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
*होम क्वॉरंटाईन*
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 49 हजार 117 इतकी आहे.
*17 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह*
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 067 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 हजार 417 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2487 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 हजार 918 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 650 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 650 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 11 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 75 हजार 764 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 17 हजार 972 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

*दखल न्यूज भारत*