चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे डीन कोरोना पॉझिटिव्ह…..

0
293

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन (अधिष्ठाता) कोरोना पोझीटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पोजीटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना क्वारंटीन करण्यात आले असून, त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्यानं यंत्रणेत खळबळ उडाली आहे.