खेलो इंडिया साठी बास्केटबॉल खेळाची निवड चाचणी

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत’

मुंबई, दि. २० : ४ थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन दि. ५ ते १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हरयाणा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा १८ वर्षा आतील मुले-मूली वयोगटात होणार आहेत. महाराष्ट्राचे खो-खो, कबड्डी व बास्केटबॉलचे संघ पात्र ठरले आहे. पैकी बास्केटबॉल खेळाची मूलींची निवड चाचणी वाय. एम. सी. ए. क्रीडांगण, घाटकोपर (पू.), येथे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. सुरु होईल. अधिक माहितीसाठी वासुदेव थिटे (संपर्क मो. क्र. ८४२२९१०१३७) यांना संपर्क साधावा.
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाने ब्लॉग व व्हॉट्स अप ग्रुप वर संबंधित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार बास्केटबॉलच्या फक्त पात्र विद्यार्थीनी खेळाडूंनी सर्व कागदपत्रांसह दिलेल्या ठिकाणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ८ वा. निवड चाचणी साठी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी केले आहे.