घाटकोपर मध्ये मोठ्या जल्लोषात कुमार ग्रुप मित्र मंडळाकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

148

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर पारशीवाडी मध्ये कुमार ग्रुप मित्र मंडळाकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्सवात करण्यात येत असते. या वर्षी या मंडळाचे २६ वे वर्ष आहे. कोरोनाचे संकट आज संपूर्ण जगात पसरले आहे त्यामुळे या वर्षी सर्व ती खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरून मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मंडळाचे संस्थापक छोटेलाल यादव, मंडळाचे अध्यक्ष अरुण यादव, आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होत्या