हिवरखेड येथे वंचितचे बहुजन आगाडीचे डफली बजाव आंदोलन

201

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब देशोधडीला लागला असुन लोकांना ऊपासमारीची वेळ आली आहे, लॉकडाऊन तत्काळ मागे घेऊन सार्वजनिक परिवहन सेवा सुरु करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी हिवरखेडच्या वतीने बसस्थानकासमोर डफली बजाव आंदोलन केले, देशात गेल्या साडेचार महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु आहे या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडुन जवळपास १२ कोटी लोकांवर बेरोजगारिची कुऱ्हाड कोसळली आहे, त्यानंतर जुलै पासुन अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली आहे त्यात काही अटि शर्थीसह दुकाने आणि उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्याच बरोबर ग्रामीण भागातील जनतेची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवाही अनेक ठिकाणी बंद आहेत, त्यामुळे लॉकडाऊन उठवून सार्वजनिक परिवहन सेवा तत्काळ सुरु करावी या मागणीसाठी हिवरखेड बसस्थानकासमोर वंचितच्या पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले, या आंदोलनामध्ये भारिपचे मा.ता.अध्यक्ष प्रकाशजी खोब्रागडे, पं.स. गटनेते प्रा. संजय हिवराळे, जि.सदस्या सौ. दिपमालाताई दामदर, सौ. प्रमोदीनीताई कोल्हे, सौ.माधुरीताई हिवराळे,ता. उपाध्यक्ष महिला आघाडी,सौ.कुसुमबाई विरघट मो.इद्रीस पं.स. सदस्य, शांताराम कवळकार, वचित चे तालुका अध्यक्ष संदिप इंगळे, नरेश बांगर,दिनेश इगळे अजय वानखडे गोपाल विरघट ,
हिपाजतभाई, विनोद भोपळे, मोईज जमादार, सुशिल इंगळे,रतन दांडगे, सचिन वाघ, शुभम अंदुरकर, यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी,सम्यक विद्यार्थीआंदोलनाचे पदाधिकारि उपस्थीत होते.