समाजसेवी संघटना हिंद सेनेच्या वतीने गरजु लोकांना अन्नधान्याचे वाटप

165

 

साकोली तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाउन केले आहे.त्यामुळे सर्व उद्योग व कामधंदे ठप्प झाले आहेत.आज मजुर कामगारांच्या कामावर गदा आली आहे.याचे गांभीर्य लक्षात घेता समाजसेवी संघटना हिंद सेनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी श्री. भाष्कर येवले व जिल्हा अध्यक्ष आशिष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गरीब असहाय्य व गरजु लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.देवमनजी मानकर,सुरज सोनटक्के, अंकीत पंचभाई, रोहीत कोडापे,गितेश टेंभुर्णे, संजय टेंभुर्णे व हिंद सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.