अकोट येथे वंचितचे डफली बजाव आंदोलन

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब देशोधडीला लागला असुन लोकांना ऊपासमारीची वेळ आली आहे.लॉकडाऊन तत्काळ मागे घेऊन सार्वजनिक परिवहन सेवा सुरु करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोटच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डफली बजाव आंदोलन केले. देशात गेल्या साडेचार महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु आहे या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडुन जवळपास १२ कोटी लोकांवर बेरोजगारिची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यानंतर जुलै पासुन अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली आहे त्यात काही अटि शर्थीसह दुकाने आणि उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्याच बरोबर ग्रामीण भागातील जनतेची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवाही अनेक ठिकाणी बंद आहेत.त्यामुळे लॉकडाऊन उठवून सार्वजनिक परिवहन सेवा तत्काळ सुरु करावी या मागणीसाठी अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज चौंका मध्ये वंचितच्या पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले .या आंदोलनामध्ये भारिपचे शैलेश धांदे,
पं.समिति सभापती लताताई नितोने,
छञुघ्न नितोने,संजय पुंडकर, भारिपचे मा.अकोट ता.अध्यक्ष संदीप आग्रे पं.स. उपसभापति निलेश झाडे, गजानन दौंड,पं.स. गटनेता धिरज सिरसाट,विशाल तेलगोटे,समीर पठान, अमन गवई,अभिमन्यु धांदे,नगरसेवक, दिनेश घोडेस्वार,नगसेवक नुरजम्मा, युवराज मुरकुटे, नितीन वाघ,राहुल वानखडे, रामकृष्ण मिसाळ,अतुल अढाऊ, स्वप्नील इंगळे,नितीन वानखडे,हिरा सरकटे, अक्षय तेलगोटे, जमु पटेल, नंदकिशोर कोरडे,सुभाष तेलगोटे, विक्की तेलगोटे,महिला अध्यक्षा सौ.सुनिताताई हिरोळे सौ.सुनिता वानखडे, सौ.मंगला वानखडे सौ.मंगला तेलगोटे सौ.अर्चना वानखडे सौ.माया हिवराळे सौ.जयश्री तेलगोटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी,सम्यंक विद्यार्थीआंदोलनाचे पदाधिकारि उपस्थीत होते.