पिकअप पलटलि,१९ मजूर जखमी, ६ गंभीर १३रोवणी महिला मजुरांचा समावेश(सालई टोला गावानजिकची घटना)

384

कुरखेडा/राकेश चव्हान प्र
सध्या मागिल दोन दिवसा पासुन पाऊसा ने हजेरि लावल्या मुड़े रोवणी करिता शेतकरी सरसावले आहेत महिला मजुराना कामे नसल्या मुड़े त्या इतर गावात रोवणी करिता जात असतात धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पालटून झालेल्या अपघातात १९ मजूर यामध्ये १३महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कुरखेडा मालेवाडा मार्गावर सालईटोला गावानजीक घडली यामध्ये सहा मजूर गंभीर जखमी असल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे
जखमीमध्ये पिंकी दरवडे १८,जयंत दरवडे २०,संगीता दरवडे३८,कविता देव्हारे ३६,रामू देव्हारे ४०,यादव शेंडे३५,हिना शेंडे३०,कुसूम नागोसे ५०,मोनिका दरवडे२०,गणेश नेवारे२१,पुनम पंधरे२०,गीता देव्हारे४०,गुड्डू नेवारे३०,सचिन मुंगणकर२२,गोपिका दुमाणे४०,योगिता राऊत ३५,दर्शना सहारे२५,इंदू मंडकाम ४०, सरिता मेश्राम ३५ यांचा समावेश आहे यामधे गंभीर जखमी असलेल्या पिंकी दरवडे,यादव शेंडे,कुसूम नागोसे,मोनिका दरवडे,गणेश नेवारे व सरिता दुमाणे या जखमींना येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे
सर्व महिला मजूर कुरखेडा तालुक्यातील वाघेडा येथिल रहिवासी आहेत हे
सर्व मजूर वाघेडा येथून एका खाजगी पिकअप मेटाडोरने तालुक्यातील येंगलखेडा येथे धान रोवणीच्या कामासाठी जात होते दरम्यान सालईटोला गावाजवळ वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने वाहन पालटल्याने हा अपघात झालाअपघाताचे वृत्त समजताच सुरेन्द्रसींह चंदेल माजी जी प सदस्य, भाजपचे तालुकाध्यक्ष नाजुक पाटील पुराम,माजी तालुकाध्यक्ष राम लांजेवार ,जेष्ट पत्रकार बंडुभाऊ लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली