जि.प.अध्यक्ष श्री मा.अजय कंकडालवार घेतले एटापल्ली पंचायत समिती चा आढावा एटापल्ली पं.स. अंतर्गत झालेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार

150

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम: एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून अनेक कामे नियमबाह्यरित्या करण्यात आल्याची बाब समोर आली असून या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर लवकरच कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी दि.११ ऑगस्ट रोजी एटापल्ली पंचायत समितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक कामांतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. जि.प. अध्यक्षांनी विविध कामांचा आढावा घेत सबंधितांना कामे योग्य प्रकारे व नियमानुसार करण्याचे आदेश दिले आहेत.
जि.प. अध्यक्षांनी तालुक्यातील कोविड – १९ ची परिस्थिती, विलगीकरण कक्ष, आरोग्य सेवा, कृषी तसेच विविध विकासकामांवर चर्चा केली. तालुक्यात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेबाबत माहिती जाणून घेतली. घरकुल योजनेच्या कामात पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये तसेच पं.स. चे अधिकारी आणि ग्रामसेवकांमध्ये ताळमेळ नसल्याचे जाणवले. यामुळे अधिकाऱ्यांना जि.प. अध्यक्षांनी चांगलेच धारेवर धरले. यापुढे कामातील हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
ठक्कर बाप्पा योजनेतून तालुक्यात अनेक कामे करण्यात आली आहेत. परंतु या कामांमध्ये अनियमितता तसेच गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. अनेकांनी या कामांची चौकशी करून सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या कामांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.