Home रत्नागिरी कामथे रुग्णालयाला देंटीलेटर देण्याची हेल्प फाऊंडेशनची मागणी

कामथे रुग्णालयाला देंटीलेटर देण्याची हेल्प फाऊंडेशनची मागणी

158

 

प्रतिनिधी ओंकार रेळेकर.

चिपळूण : उपजिल्हा रुग्णालयात उपचार
घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या
दिवसेंदिवस वाढत आहे. व्हेंटीलेटर
अभावी काही रुग्णांना रत्नागिरी किंवा
अन्य शहरांत उपचारासाठी न्यावे
लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन
चिपळूण नगर परिषदेने कामथे
रुग्णालयाला व्हेंटीलेटर द्यावा अशी
मागणी हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष
सतीश कदम यांनी चिपळूण पालिकेचे
मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते
यांच्याकडे केली आहे.

शहर व परिसरात कोरोना
रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
त्यामुळे आरोग्य सुविधांवर मर्यादाही
येत आहेत. आपल्या शहराजवळच
कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय आहे.
या ठिकाणी व्हेंटीलेटरची आवश्यकता
आहे. ज्या गंभीर रुग्णांना केवळ
व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे, त्यांना रत्नागिरी वा अन्य ठीकाणी हलवावे लागते. आपण सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाने दिलेल्या
अधिकारात एक व्हेंटीलेटर खरेदी
करावा व कामथे रुग्णालयात त्वरितबसवावा, ज्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतील

दखल न्यूज भारत

Previous articleसाकोलीत 15 व 16 ऑगस्ट रोजी जनता कर्फ्युचे आवाहन
Next articleमल्हार महासंघ महिला आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री, वृक्षाली दत्तू मासुळे यांची निवड झाली