राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या मुले व मूलींच्या दोन्ही संघांची निवड चाचणी

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. १७ : राजस्थान येथे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मुले व मुलींच्या संघाची निवड चाचणी भिवंडी शहरातील मान सरोवर येथील बास्केटबॉल क्रीडांगणात शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. सुरु होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सुधीर सर (संपर्क मो. क्र. ९८९२२५०४१९) यांना संपर्क साधावा.

महाराष्ट्र संघाची निवड करताना इच्छुक व चांगल्या खेळाडूंची निवड करुन शिबीराचे आयोजन करण्यात येईल. शिबीरात खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाईल. सरावावर भर देण्यात येईल. शेवटी अंतिम संघाची निवड करताना उत्कृष्ट १२ मुले व १२ मूली असे महाराष्ट्राचे दोन संघ तयार केले जातील अशी माहिती सुधीर सर यांनी दिली.