साकोलीत 15 व 16 ऑगस्ट रोजी जनता कर्फ्युचे आवाहन

178

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-मा.जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशानुसार दिनांक 15-08-2020 रोजी दुपारी 12 वाजता पासून दिनांक 16-08-2020 रोजी संपुर्ण दिवस रात्र जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली यांनी केले आहे.
या दोन्ही दिवशी शहरातील सर्व किराणा दुकान, फळे व भाज्या विक्रेते, फिरते पथविक्रेते व इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.फक्त आवश्यक औषधालय , दवाखाने व दूध पुरवठा या अतीआवश्यक सेवा सुरू राहतील.दिनांक 15-08-2020 रोजी दुपारी 12 वाजता पासून ते दिनांक 16-08-2020 पर्यंत संपूर्ण दिवस रात्र जनता कर्फ्यु पाळुन कोरोनाला हरवण्याचा लढाईत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली यांनी केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.असे पत्रकात नमूद केले आहे.