Home महाराष्ट्र सरांडी कोविड केअर केंद्रातील नागरिकाचा मृत्यू आरोग्य विभागाचे गलस्थान कारभारामुळे झाल्याचा जनमानसात...

सरांडी कोविड केअर केंद्रातील नागरिकाचा मृत्यू आरोग्य विभागाचे गलस्थान कारभारामुळे झाल्याचा जनमानसात चर्चा

178

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा : सरांडी येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा येथे कोविड केअर केंद्र तयार करण्यात आले आहे.

या केंद्रातील इसम अचानक व तडकाफडकी मृत्यू पावल्याने कोविड केअर केंद्र हे मृत्यूचे केंद्र बनत असल्याचा सूर जनतेत लगावला जात आहे.

या केंद्रात कोविडचे संपर्कात आलेले पण लक्षणे नसलेले कोविड पोसिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येते. जेणेकरून रुग्णाच्या आरोग्याची काळजी होते. संसर्गाच्या प्रसाराला आळा बसतो.

नमुने परीक्षण सकारात्मक आल्यास अन्य इसमांना कोविडचे प्रादुर्भाव होऊ नये. संसर्ग व्यक्तीचे संपर्कात आलेल्या इसमाचा शोध, तपास हे तसे जिकरिचे कार्य आहे. प्रसंगी मग बळाचा देखील वापर करावा लागत असते.

यातच महसूल, पोलीस प्रशासन यांतील कर्मचारी वर्ग आरोग्य विभागायाचे खांद्याला खांदा लावून कार्य करीत असून कोविडवर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आहेत.

उल्लेखनिय असे की, सरांडी येथील कोविड केअर केंद्रातील इसमाचे अँटीजन तपासणी निगेटिव्ह होती. पण हलकेफुलके ताप असल्याने केवळ शंसयीत म्हणूनच ते केंद्रात होते. पण त्यांचे आकस्मिक मृत्यूउपरांत तपासणी अहवाल पॉंझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाविषयी जनमानसात कलहोळ व्यक्त केला जात आहे. माणवाचे परीक्षण अहवाल देखील मृत्यू पश्चात सकारात्मक दाखविला जाऊ शकण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

८ आगष्ट रोजी सरांडी कोविड केअर केंद्रात ६७ रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. यापैकी केवळ दोन व्यक्ती निगेटिव्ह होते. तर मग हे केंद्र कोविड केअर सेंटर कसे ? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.

या कोविड केअर केंद्रात कोविडची बाधा असण्याची वा होण्याची शक्यता असणारे व्यक्तींचे केंद्र आहे. आणि कोविड बाधितांची संख्या तालुक्यात वाढत असेल तर विलगीकरण केंद्र निर्माण व्हावे अथवा हाय रिस्क केंद्र निर्माण होणे गरजेचे असतांना तसे घडून न आल्याने कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तिरोडा तालुक्यतील कोरोचा दुसरा बळी केवळ आणि केवळ कोविडच्या धसक्याने कोविडचा दुसरा बळी ठरला आहे. अशी चर्चाविषय बनत आहे.

तोच इसम अतिदक्षता विभागात असता तर त्याचे बळी गेले नसते. त्याचे पहिले व दुसरे अँटीजन तपासणी निगेटिव्ह असल्याचे बोलले जाते. याउपरांत त्याचे आरटीपीसीआर तपासणी करिता सरांडी केंद्रात थांबविण्यात आले. सुट्टी होणार या आशेत तो होता. ८ ते ९ वा. च्या सुमारास तो आप्तांसी व्यस्थित बोलला होता. पण आरटीपीसीआर अहवाल आला नसल्याने तेथून सुट्टी मिळणे शक्य नसल्याचे कळाल्यावरून त्याची अस्वस्थता वाढली. दुखणे पायात आणि ऑपरेशन पोटाचे काहीशा याच गलस्थान कारभाराने त्याचे ११ वाजताच्या सुमारास सरांडी येथेच निधन झाले असल्याचे बोलले जात आहे.

ज्या दिमतीने आरोग्य विभागाने भर्ती करण्याचे औदार्य दाखवले तेढेच आरोग्याची सेवा श्रुषा करण्यात दाखवले असते तर त्यांचे प्राण देखील बचावू शकले असते.

आता हे केंद्र प्रत्यक्ष कोविड प्रादुर्भाव रुग्ण केंद्र बनत असल्याने प्रत्येक इसम हा एकमेकापासून दुरावा पाळत आहे. आता आपले १४ वर्षा यासारखे वनवास संपणार आहे. यात अडचण नको म्हणून प्रसंगी एखाद्याची प्रकृती बिघडल्यास कोणी त्या इसमास स्पर्श करण्यास समोर येत नाही.

सरांडी हे केंद्र मल्टीव्हिटॅमिन, ताप, खोकल्याचे वाटप कर्मचारीच केंद्र बनले आहे.

गोळया वाटप खोलीत सीसी टीव्ही कॅमेरे देखील आहेत. यावरून प्रत्येक रुग्णावर नजर ठेवली जाऊ शकते. या केंद्रात सीएचओ व स्टॉप नर्स व्यतिरिक्त वैदयकीय अधिकारी नाही. खान पानाची देखील व्यस्थित सोया नाही. शिळे अन्न दिले जाते. केंद्रातील लोकांना अनेक समश्या आहेत. पण तिथे कर्त्यावरील कर्माचारी यांचे व्यतिरिक्त कोणताही अधिकारी भिरकत नाही. सदर इसम आपल्या बेडवर बराच वेळपर्यंत पडून राहावे लागले. त्यावर वेळीच संबंधित कर्माचे लक्षच गेले नसावे. यातच त्याचा बळी गेला असावा अशी चर्चा व्यक्त केली जात आहे. केवळ औपचारिकता उपजिल्हा रुग्णालयात पार पाडण्यात आली. अखेरचा परीक्षण अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याने आप्त कुटुंबीय, नातलग, गणगोत करुण दुःख सागरात लोटले गेलेत. मात्र आरोग्य प्रशासनाचे हलगर्जीपणानेच त्या इसमाचा मृत्यू झाले असल्याचे जनमानसात बोलले जात आहे. यापुढे विशेष लक्ष दिले गेले नाही. तर अश्या गूढ मृत्यूच्या शक्यतेत वाढ होण्याचे नाकारल्या जावू शकत नाही.

तिरोडा शहर व तालुक्यात अनेक प्रशस्त शाळा, महाविद्यालये आहेत. येथील शिक्षण कोविड प्रदूर्भावाने बंद देखील आहेत. अश्या कठीण समयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी विलगिकरण केंद्रासाठी उपयोग केल्यास नुसता शंसय असणाऱ्यांचा बळी जाणार नाही. चर्चा विषय काहीही असले तरी नागरिकांनी कोविड आहे हे स्वीकारून पथ्थ पाळून सहकार्य करावे. विकसित देश देखील होणारे प्रादुर्भाव आणि मृत्यू बळी जनसहकार्यानेच वाचवू शकले आहेत.

जिल्हा आरोग्य व्यवस्थापणेच्या सर्वेसर्वा यांनी गैरसोयीची दखल घेऊ आपली सुप्रशासनता दाखवावी. अशी जनभावना जनता व्यक्त करीत आहे.

याकडे आपत्ती व्यवस्थान व जिल्हा आरोग्य प्रशासन कोणती भूमिका घेतात. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Previous articleचिंतामणी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न
Next articleसाकोलीत 15 व 16 ऑगस्ट रोजी जनता कर्फ्युचे आवाहन