Home चंद्रपूर  चिंतामणी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न

चिंतामणी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न

169

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित घुग्घूस येथील चिंतामणी महाविद्यालयाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,प्राचार्य,स्व.वसंतराव दोंतुलवार यांच्या जयंतीनिमित्त ”वुमेन्स एम्पॉवरमेंट अँड लाॅ” या विषयावर महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. ,समाजशास्त्र विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारला संस्थेच्या अध्यक्षा व आमच्या मार्गदर्शीका प्रा. शुभांगीताई वसंतराव दोंतुलवार या उपस्थित होत्या.तसेच संस्थेचे सचिव स्वप्नील दोंतुलवार यांनी कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर कुंभारे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक प्राचार्य स्व. वसंतराव दोंतुलवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.आणि महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर कुंभारे होते त्यांनी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारला उपस्थित सर्व सहभागी प्राध्यापक वृंदांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते डॉ.स्मिता पांडे एच.ओ.डी डिपार्टमेंट ऑफ पोलिटिकल सायन्स पी.टी. डी.डी.यू.गव्हर्नमेंट कॉलेज राजाजीपूर,लखनो.उत्तर प्रदेश या होत्या.त्यांनी “वुमेन्स एम्पॉवरमेंट अँड लाॅ” या विषयावर उपस्थित सर्व सहभागी जणांना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. भाग्यश्री देशपांडे प्रोफेसर ऑफ लाॅ. डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लाॅ,अमरावती या होत्या.डॉ.देशपांडे यांनी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारला सर्व सहभागी प्राध्यापक वृंदांना “वुमेन्स एम्पॉवरमेंट अँड लाॅ” या विषयावर सखोल मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रवी धारपवार राष्ट्रीय वेबिनारचे सह-समन्वयक, आय क्यू एसी कॉर्डिनेटर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व सहभागी प्राध्यापक वृंदाना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये एकूण एक हजार पाचशे प्राध्यापकांनी नोंदणी करून कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेंद्र कुंभारे, समन्वयक, एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार व समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. तर आभार प्राध्यापक गणेश सुरजूसे इंग्रजी विभाग प्रमुख यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष गोहोकार, डॉ. नितीन कावडकर, प्रा. मंगेश जमदाडे, डॉ. माधव कांडणगिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारीआदींनी कठोर परिश्रम घेऊन सहकार्य केले.

Previous articleआमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, सुरु होणार व्यायमशाळा उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा
Next articleसरांडी कोविड केअर केंद्रातील नागरिकाचा मृत्यू आरोग्य विभागाचे गलस्थान कारभारामुळे झाल्याचा जनमानसात चर्चा