Home चंद्रपूर  आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, सुरु होणार व्यायमशाळा उपमूख्यमंत्री अजित...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, सुरु होणार व्यायमशाळा उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा

165

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
लॉकडाउन काळापासून व्यायमशाळा बंद असल्याने व्यायमशाळा मालक व येथे काम करणा-या कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. त्यामूळे व्यायमशाळा सुरु करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. तसेच सातत्याने त्यांच्याकडून सदर मागणीचा पाठपूरावाही सुरु होता. दरम्याण आज आ. जोरगेवार यांनी उपमूख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली असून व्यायमशाळा सुरु करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. परिणामी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पर्यत्नांना यश आले असून आता लवकरच व्यायमशाळा सुरु होणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने उपायोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून व्यायमशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याचा मोठा फटका व्यायमशाळा मालकांसह येथे काम करणा-या कामगारांना बसला असून त्यांच्यापूढे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. येथे काम करणारे मॅनेजरए कोचए सफाई कर्मचारीए हे बेरोजगार झालेले असून व्यवसायात गुंतलेली गुंतवणूक म्हणजे बँकेचे कर्जए हॉलचा भाडेए इलेक्ट्रिक बिलए जिममध्ये कामकरणारे कर्मचारी यांचे वेतन देण्यास जिम मालक असमर्थ झालेले असून स्वतच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या. हि बाब लक्षात घेत शती व अर्टींवर व्यायमशाळा सुरु करण्यात यावात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीचा सतत पाठपूरावा त्यांच्याकडून केल्या जात होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्यभरातील व्यायमशाळा सुरु करण्याच्या दिशेने सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी याच मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली असून व्यायमशाळा मालक व तेथे काम करणा-या कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यांनंतर राज्यभरातील व्यायमशाळा सूरु करण्याच्या दिशेने लवकरच निर्णय घेलता जाणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर उपमूख्य मंत्री अजीत पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशीही सदर विषयावर चर्चा केली असून राज्यभरातील व्यायमशाळा सुरु करण्याच्या दिशेने लवकरच रितसर आदेश पारीत करण्यात येणार आहे.

Previous articleउद्याच्या कॅबिनेट बैठकीत विज बिल ग्राहकांना न्याय देणारा निर्णय घ्या, आमदार किशोर जोरगेवार यांची उपमुख्यमंत्री यांना मागणी
Next articleचिंतामणी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न