प्रशासकीय सूचनांचे पालन करून जन्मदिनी शुभेच्छा देण्याचे मा.खा देशमुख यांचे शुभचिंतकाना आवाहन

 

वाशिम/रिसोड(फुलचंद भगत)-प्रशासकीय सूचनांचे पालन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी शुभचिंतकाना केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मा.खा अनंतराव देशमुख म्हणाले की १९ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त दरवर्षी भेटुन आपण शुभेच्छा देता. आपल्या सदिच्छाच्या पाठबळावर मी राजकिय व सामाजिक वाटचाल केली.परंतु या वर्षी कोरोना रोगाच्या परिस्थितीमुळे आपण जिथे असाल तिथुनच शुभेच्छा दयाव्यात व कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये व प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे.व सर्वांनी कोरोनापासुन स्वतःची काळजी घ्यावी.आपले प्रेम,शुभेच्छा, सदिच्छा कायम सोबत आहेत व राहतील.दरवर्षी अनंतराव देशमुख यांच्या जन्मदिनी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी कार्यक्रम व जिल्ह्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण केल्या जाते जिल्ह्यातील हजारो शुभचिंतक शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यलयात येतात व शुभेच्छा देतात.परंतु यावर्षी देशभरात,राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता मा.खा अनंतराव देशमुख यांनी जिथे असाल तिथून शुभेच्छा देण्याचे आवाहन केले आहे.कोरोनाच्या संसर्गाचि परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे,नियमांचे तंतोतंत पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व वाढदिवसानिमित्त आपण जिथे असाल तिथूनच शुभेच्छा द्याव्या आणि कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करून आपल्या सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी असे आवाहन माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे.

फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206