नगसेवक विक्रम शिरसट यांनी जिंकली पंढरपूरकरांची मने.. युवकांसमोर निर्माण केला एक आदर्श.

0
102

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

पंढरपूर शहरातील नगरसेवक विक्रम शिरसट यांनी लॉक डाऊन च्या काळामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांची मने जिंकण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे विक्रम शिरसट हे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांचे चिरंजीव असून शिरसट घराण्यातील ही दुसरी पिढी सामाजिक कार्यामध्ये आज दिसून येत आहे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांनी सुद्धा गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूर शहर उपनगर या भागामध्ये अनेक सामाजिक काम केले असून गोरगरीब, गरजवंत, आर्थिक व दुर्बल वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य माननीय लक्ष्मणभाऊ शिरसट यांनी केले आहे गोरगरीब गरजवंत लोकांच्या हाताला काम देण्याचे उल्लेखनीय कार्य शिरसट यांनी केले आहे आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव नगरसेवक विक्रम शिरसट यांनीसुद्धा आज कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये अनेक विशेष सामाजिक उपक्रम राबवून सर्व पंढरपूरकरांच्या मनावर राज्य करण्याचे कार्य केले आहे त्यामुळे आज पंढरपुरातील सर्व जनतेच्या मनामध्ये शिरसट परिवाराच्या विषयी प्रेम आदर व आपुलीची भावना निर्माण झाली आहे.
दिनांक 22 मार्च पासून ते आज रोजी पर्यंत विक्रम शिरसट यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती.

दिनांक 22 मार्च रोजी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या वतीने कोरोना या माहामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता सबंध देशामध्ये लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. अचानक झालेल्या या लॉक डाऊन मुळे अनेक गोरगरीब गरजवंत हातावर पोट असणारे कुटुंब उघड्यावर पडल्याचे दिसून आले अनेक लोकांनी स्थलांतर करत असल्याचे आपण पाहिले आहे याच दरम्यान आपल्या भागातील व शहरातील एकही व्यक्तीचा भुकेने बळी जाऊ नये व एकाही व्यक्तीचे कुटुंब अन्नावाचून उपाशी राहू नये याकरिता युवा नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरपूर शहरातील व भागातील सुमारे दोन हजार कुटुंबांना जीवन आवश्यक असणारे अन्नाचे चे किट वाटप करून नागरिकांच्या उपजीविकेचा व मूलभूत गरजेचा प्रश्न मार्गी लावला या दोन हजार कीट मध्ये जवळपास दहा हजार लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप करून मोठे पुण्य कमविण्याचे ह काम शिरसट यांनी केले आहे
कोरोनाच्या काळामध्ये बाधित असलेल्या लोकांना उपचाराकरिता रक्ताची गरज भासू लागली होती आणि राज्य शासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती शासनाच्या या विनंतीला मान देऊन व जनतेचे हित लक्षात घेऊन विक्रम शिरसट यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले व अनेक युवकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच शिरसट यांनी स्वतः रक्तदान करून आदर्श निर्माण केला.

देशाच्या व राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून पोटासाठी व उपजीविकेसाठी पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक आले होते परंतु अचानक झालेल्या लॉक डाऊन मुळे परराज्यातून आलेल्या, जिल्ह्यातून आलेल्या अनेक नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते अशा काळामध्ये ज्या लोकांनी त्यांना कामाकरिता पंढरपूर येथे आणले होते त्यांनी त्यांची साथ सोडली होती व अशा गरीब कामगारांना वाऱ्यावर सोडून दिले होते अशा गरीब कामगारांना अडचणी आल्यामुळे त्यांनी विक्रम शिरसट यांच्याशी संपर्क केल्यानंतर शिरसट यांनी अनेक कामगारांना त्यांच्या घरी सुखरूप जाण्याकरीता त्यांची फिवर टेस्ट व पास काढून देण्याची पर्यायी व्यवस्था नगरपालिका रुग्णालय पंढरपूर येथून करून दिली व सर्व लोकांची तपासणी करून त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या घरी त्यांना सुखरूप जाईपर्यंत सर्व सोयी व्यवस्था करून दिल्या आपल्या गावी सुखरूप पोहचल्यानंतर अनेकांनी शिरसट यांचे फोनद्वारे आभार देखील मानले आहे. आपल्याकडे आलेला व्यक्ती कुठला जरी रहिवासी असेल मग तो आपल्या प्रभागातील असो गावातील असो किंवा परराज्यातील असो परंतु तो एक माणूस आहे आणि माणूस म्हणून आपण त्याला सहकार्य करणे, मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ही भावना नगरसेवक विक्रम शिरसट यांनी व्यक्त केली. निस्वार्थ, निष्पक्ष सामाजिक कार्य करण्याचे बाळकडू विक्रम शिरसट यांना त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्याकडून मिळाल्याचे दिसून येते.
कोरोना महामारी चा संसर्ग वाढत असल्यामुळे शहरातील लोकांना याच्या विषयी जागृत करणे व त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे मनाशी बाळगून नगरसेवक शिरसट यांनी आयुष मंत्रालयाच्या वतीने सुचित करण्यात आलेल्या आर्सेनिक एल्बम या गोळ्या मोफत वाटप करून नागरिकांचे आरोग्यहीत जपण्यास व नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोलाचे व शर्तीचे प्रयत्न केले यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून इम्युनिटी वाढवण्या बाबत नागरिक जागरूक झाले आहेत अशी बहुमोल कामगिरी एक जबाबदार नगरसेवक म्हणून यांनी कर्तव्यदक्षपणे पार पाडली.
शिरसट ज्या प्रभागांमध्ये नगरसेवक आहेत त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु नगरसेवक शिरसट यांनी स्वतःहून ग्राउंड लेवलवर येऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आव्हान केले व नागरिकांना घरोघरी जाऊन त्यांची फिवर टेस्ट ऑक्सीमीटर टेस्ट आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करून घेतली ज्यामुळे रोगाचा अधिक प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध झाला आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली. ज्या ठिकाणी रुग्ण सापडला होता त्या ठिकाणी नगरसेवक स्वतः कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन जंतूनाशक फवारणी केली आणि आपल्या भागातील नागरिकांचे रक्षण ही प्रथम जबाबदारीच नाही तर कर्तव्य आहे हे त्यांनी कामातून दाखवून दिले नगरसेवक यांनी स्वतःहून कंटेनमेंट झोन जंतुनाशक फवारणी करत नागरिकांना आधार देण्याचे काम केले.
प्रभाग क्रमांक चार मधील एका वयोवृद्ध महिलेचे अल्पशा आजाराने मृत्यू झाले होते परंतु काही कारणास्तव त्या महिलेच्या मुलाला अंत्यसंस्कारासाठी येण्यास जमले नाही सदर महिलेचा अंत्यसंस्कार पार पाडणे महत्त्वाचे होते दरम्यान सदर महिलेच्या मुलाशी संपर्क साधून या महिलेचे अंतिम संस्कार पार पाडण्याचे काम कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून शिरसट यांनी केले ज्याठिकाणी रक्ताचे नातेवाईक कोरोना सारख्या महामारी मध्ये मृतदेह स्वीकारत नाहीत किंवा अंत्यविधीला सुद्धा जात नाहीत अशा काळामध्ये एक नगरसेवक आपल्या प्रभागातील महिलेच्या मृतदेहावरील अंतिम संस्कार करतो हे एक माणुसकीचे उदाहरण संपूर्ण पंढरपूर शहर आणि जिल्ह्याने अनुभवले आहे
कोरोना या महामारीचा संसर्ग वाढत असताना आपल्या भागातील आणि शहरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेत नगरसेवक शिरसट यांनी रॅपिड टेस्ट चे नियोजन केले व नागरिकांना टेस्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले
नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आले. यावेळी विक्रम शिरसट यांनी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक चार व पाच मधील कंटेनमेंट झोन असलेल्या गोविंदपुरा, रामबाग, जुनी पेठ, कोळी गल्ली, हरिदास वेस, भजनदास चौक, आदी भागात जाऊन नागरिकांना टेस्ट करून घेण्यासाठी विनंती केली होती याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत नागरिकांनी न घाबरता आपली टेस्ट करून घेतली सध्या पंढरपूर शहरामध्ये दिनांक 7 ऑगस्ट रोजी पासून ते 13 ऑगस्ट 2020 मध्यरात्रीपर्यंत लॉक डाऊन असून या लॉक डाऊन च्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजिन टेस्ट करून चेस द व्हायरस हा उपक्रम राबवून येत्या काही दिवसातच पंढरपूर शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केला.