Home गडचिरोली सिरोंचा -आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न...

सिरोंचा -आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न बुजविल्यास अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व खासदार अशोक नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारू आदिवासी विद्यार्थी संघाचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना तीव्र इशारा आविसं कडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

194

 

सिरोंचा…सिरोंचा -आल्लापल्ली व सिरोंचा -आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांचे आत कायमस्वरूपी न बुजविल्यास अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारण्याची तीव्र इशारा आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचाने दिले आहे.
सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांचामार्फतीने आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आविस कडून पाठविलेल्या निवेदनातुन लोकप्रतिनिधीच्या घरासमोर खड्डे खोदो आंदोलन व सिरोंचा ,बामणी व पेंटींपाका येथे चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा देण्यात आलं आहे.

आविसचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात, सिरोंचा-आल्लापल्ली व सिरोंचा- आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील मागील सहा ते सात वर्षांपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून नेहमी हे खड्डे बुजविण्याचे काम थातूर मातूर होत असून आजपर्यंत कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात आले नाही.परिणामी गर्भवती महिलांसह या दोन्ही महामार्गावरून ये -जा करणाऱ्यां नागरिकांसह दुचाकी ,चारचाकी व अन्य वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्याची अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं तरीही आजपावेतो कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात आले नसल्याचं नमूद केले आहे.
सिरोंचा तालुक्यातील दोन्ही महामार्गावरील पडलेले खड्डे राज्य सरकार व संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व पंधरा दिवसाचे आत दोन्ही रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा आदिवासी विद्यार्थी संघाकडून देण्यात आली.

सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांना निवेदन देतांना आविस चे ज्येष्ठ नेते आकुला मल्लिकार्जुन, मंदा शंकर,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,आविस सल्लागार रवी सल्लम,जि.प.माजी सभापती जयसुधा जनगम,जि.प.सदस्या सरिता तैनेनी,पं. स.सदस्या शकुंतला जोडे,सरिता पेद्दी, सुधाकर पेद्दी,जाफराबाद ग्रा.प.सरपंच बापू सडमेक,महेश भंडारी,संतोष पडाला,संमय्या चौधरी,सुरेश येरकरी,श्याम बेज्जनी,मारोती गणापूरपू, नागराजू इंगीली,अशोक हरी,अशोक इंगीली,किरण वेमुला,साई मंदा,रवी सुलतान,तिरुपती चिट्याला,लक्षण बोल्लेसह आविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.
आविसकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,जिल्हाधिकारी दिपक सिंगला,कार्यकारी अभियंता सिरोंचा,आल्लापल्ली व गडचिरोली यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीनांही निवेदन पाठविण्यात आले.

Previous articleचाकरमानी कोरोनाच्या चक्रव्यूहात गावात 10 दिवस तर पुन्हा नोकरी च्या गावात 14 दिवस क्वारंटाईन ; आधी चाचणी मगच कोकणात प्रवेश शासनाचा निर्णय
Next articleनगसेवक विक्रम शिरसट यांनी जिंकली पंढरपूरकरांची मने.. युवकांसमोर निर्माण केला एक आदर्श.